भीषण अपघात ! थार ५०० फूट दरीत कोसळली अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं
भीषण अपघात ! थार ५०० फूट दरीत कोसळली अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं
img
वैष्णवी सांगळे
ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो, पण येथील अरुंद, घसरडे आणि वळणावळणाचे रस्ते अपघातांना आमंत्रण देतात. धुक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता, वाहनचालकांची बेपर्वाई आणि रस्त्यांची खराब स्थिती ही अपघातांची प्रमुख कारणं ठरत आहेत. दरम्यान बुधवारी पुन्हा याठिकाणी अपघात झालाय. 

ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुणे-माणगाव मार्गावर मंगळवारी हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणात गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने काल बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारचा शोध सुरू होता. मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. अखेर आज सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. आणखी दोन जण बेपत्ता असल्याचे समजते.

धोकादायक उतार, खोल दरी आणि चेंदामेंदा झालेल्या वाहनाचे अवशेष पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असून, दरी खोल आणि दगडांनी भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे. 

ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह दिसून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू आहे. भीषण अपघातामुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group