शुक्रवार ठरला घात वार!
शुक्रवार ठरला घात वार! "या" ठिकाणी दोन अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
img
Dipali Ghadwaje
निफाड : शुक्रवार हा निफाडकरांसाठी एक अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला. शुक्रवार दिनांक 16 मे रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये निफाड परिसरातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. त्यामुळे निफाड परिसरावर शोक कळा पसरली आहे. 


पहिला अपघात हा नांदगाव तालुक्यातील मन्याड नदी जवळ घडला असून या अपघातामध्ये जळगाव तालुका निफाड येथील निलेश शरद गंगाधर कराड आणि तुषार शरद हरिभाऊ कराड तसेच बोकडदरे तालुका निफाड येथील अक्षय दौलत सोनवणे असे तीन तरुण बळी पडले.

हे तिघेही मित्र नांदगाव तालुक्यातील बेहेळगाव येथे विवाह सोहळ्यासाठी गेलेले होते. दुपारचा लग्न सोहळा आटोपून सायंकाळी घरी परत येत असताना चालकाचे त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात होऊन या अपघातात तिघांचा मृत्यू ओढवला. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोघांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

दुसऱ्या दुर्घटनेत शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास  मोटरसायकल वरून शिवडी तालुका निफाड  येथील रहिवासी अनिल विश्वनाथ आहेर हे पत्नी ज्योती आणि तीन वर्षाचा मुलगा वेदांश  यांच्या सह घरी परत जात होते. निफाड नाशिक महामार्ग वरील जळगाव फाटा येथे एका भरधाव कंटेनर ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सौ ज्योती आहेर आणि मुलगा वेदांश आहे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक अनिल आहेर गंभीर जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  या दोन्ही अपघातांमुळे निफाड परिसरात सर्वत्र  हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group