भीषण अपघात ! डंपरने बसला दिलेल्या धडकेत १९  प्रवासी ठार
भीषण अपघात ! डंपरने बसला दिलेल्या धडकेत १९ प्रवासी ठार
img
वैष्णवी सांगळे
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातुन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज सकाळी हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर डंपर ट्रकने एका आरटीसी बसला धडक दिली. धक्कादायक म्हणजे या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 
 
बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी होते. ते रविवारची  सुट्टी असल्याने घरी गेले होते आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी हैदराबादला परतत होते. ही बस तंदूरहून हैदराबादला जात होती.  पोलिसांनी सांगितले की, एका वेगाने येणार्‍या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बसला धडक दिली. 



चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेटजवळ बसचे मोठे नुकसान झाले आणि डंपरमधील भरलेली खडी बसमध्ये असलेल्या प्रवाशांवर पडली. खडीखाली गाडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकार्‍यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group