हृदयद्रावक ..! बहिणीला घेऊन परतताना आक्रित घडलं , दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक ..! बहिणीला घेऊन परतताना आक्रित घडलं , दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
चंद्रपूर : जळगावातील जामरनेरनंतर विदर्भातील चंद्रपूरमध्ये देखील एक भीषण अपघात झालाय. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , गावापासून ७० किमी अंतरावर दोघांचा दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोघेही गंभीररित्या जखमी झालेत. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आलं. उपचारादरम्यान दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. रमेश शामराव दडमल (वय ३६) आणि राकेश रामप्रसाद बदन (वय ३०) अशी मृतकांची नावं आहेत.

नेमकं काय घडलं ? 

चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यात असणाऱ्या किरमिटी येथील रमेश दडमल आपल्या बहिणीला घेण्यासाठी मुलासह सावली तालुक्यातील हगभीड तालुक्यात असणाऱ्या किरमिटी येथील रमेश दडमल आपल्या बहिणीला घेण्यासाठी मुलासह सावली तालुक्यातील हरांबा येथे गेला होता. शुक्रवारी बहिणीला घेऊन परत निघाला. मृतक राकेश बदन हा सुधीर दडमल या मित्रासोबत मूल येथे कार्यक्रमाला जात होता. दोघांच्याही दुचाकीची सिंदेवाही तालुक्यातील सरडपारजवळ समोरासमोर धडक झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी दोघांनाही राजुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी किरमिटी येथे शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group