दिवसेंदिवस वाहन अपघाताच्या घटना वाढत आहे. अशातच हरियाणाच्या फरिदाबादमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कारने चिरडून एकाचा मृत्यू झालाय. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश लोहान यांच्या नावावर असलेल्या कारने एकाला चिरडल्याची घटना घडली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्ताचा मुलगा कार चालवत असल्याचा मनोजच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचे दोन मित्र हे २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वृंदावनमधून सेक्टर १२ मध्ये जेवण घ्यायला गेलो होते. त्यांचा जाताना अर्ध्या रस्त्यात थारच्या कार चालकाशी वाद झाला. दोघांनी तातडीने मनोजला माहिती दिली. त्यानंतर मनोज आणि त्याचे मित्र कारने घटनास्थळी पोहोचले.
दोघांचे मित्र आल्याने थारचा चालक घाबरला. घाबरलेल्या थार चालकाने मनोजला चिरडलं. त्यानंतर थार चालकाने मनोजला चिरडून पळ देखील काढला. या अपघातात मनोज गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या मनोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मनोजच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ही कार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश लोहन यांच्या नावावर नोंद आहे.
फरीदाबादच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कारने चिरडल्याने मनोजचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस आयुक्ताचा मुलगा कार चालवत असल्याचा मनोजच्या नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय. मनोजच्या मृतदेहाचं पोस्टपार्टम केल्यानंतर नातेवाईक आरोपींच्या अटकेच्या मागणीवर अडून आहेत.