भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक ; ९ जणांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक ; ९ जणांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत  चालली आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात पहाटे हा भीषण अपघात झाला. पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग- १८ वर भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण लग्न समारंभ आटपून घरी परत जात होते. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुरुलिया-जमशेदपूर टाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ वर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. बलरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामसोल प्राथमिक शाळेजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. 

कारमधील ९ जण पुरुलियाहून झारखंडकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कारने बरमपूरहून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ९ जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कारमधील सर्वजण लग्न समारंभातून परतत होते. अपघातग्रस्त कार पुरुलियाहून बलरामपूरला जात होती. त्याचवेळी कार अनियंत्रित झाली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला तिने धडक दिली. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक देखील अनियंत्रित झाला आणि जवळच्या भातशेतीत जाऊन उलटला.

अपघाताची माहिती मिळताच बलरामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना पोलिसांनी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले.

मिळालेल्या  माहितीनुसार, कारमध्ये असणारे सर्वजण पुरुलियाच्या बाराबाजार पोलिस स्टेशन हद्दीतील अदाबाना गावातून झारखंडच्या निमडीह पोलिस स्टेशन हद्दीतील तिलैतान या गावात जात होते. हे सर्वजण बोलेरोमधून प्रवास करत होते. ही गाडी अचानक अनियंत्रित झाली आणि तिने भरधाव ट्रकला धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की गाडीचा चुराडा झाला. पोलिसांनी गाडीतून मृतदेह बाहेर काढणं देखील कठीण झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group