मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना, एकाचा जागीच मृत्यू
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना, एकाचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
मुंबई विमानतळाववरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ३० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 



विमानतळावर कन्व्हेयर बेल्ट तपासत असताना टेक्निकल सूपरवायझर २५ फूट उंचीवरून खाली कोसळला अन् जागेवरच मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी ही दुर्घटना घडली होती. विमानतळावर काम काम करणाऱ्या त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव दुर्गेश पांडे असे होते. तो अंधेरी पूर्वे भागात राहात होता. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती नोंद केली आहे.

दुर्गेश हा सहकारी दिलीपकुमार सरन यांच्यासोबत बेल्ट मार्ग तपासणीचे काम करत होता. त्यासाठी लेव्हल २ वरील फॉल्स सीलिंगवर गेला होता. तपासणी करत असताना दुर्गेश पांडे याचा २५ फूट उंचीवरून तोल गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

दुर्गेश पांडे याला उपचारासाठी तात्काळ विले पार्ले (पश्चिम) येथील नानावटी रुग्णालयात दाखल गेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांकडून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण दुखापत गंभीर असल्याने त्याचा जीव गेला. सहारा पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group