भीषण अपघात : पिकअप उलटून स्विफ्ट कारवर आदळली ; कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; नाशिक जिल्ह्यातील घटना
भीषण अपघात : पिकअप उलटून स्विफ्ट कारवर आदळली ; कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
Dipali Ghadwaje
नाशिक  रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे , अशातच नाशिक महामार्गावरील दिंडोरी शहरात गर्दीत वेगाने येणारी पिकअप वाहनचालकाचा ताबा सुटून उलटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर जाऊन आदळली. या घटनेत स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार , पिकअप क्रमांक (एमएच 15 जेसी 7455) ही अवनखेड (ता. दिंडोरी) येथून गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पुदिना भरून नाशिककडे जात असताना शहरातील बाजारपेठ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी पिकअपचालकाचे नियंत्रण सुटून दिंडोरी शहरातील साईनाथ पाववडे दुकानासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट कार (एमएच 15 एचजी 6334) या वाहनावर जाऊन आदळली.

दरम्यान कारमध्ये दोन महिला बसलेल्या होत्या , मात्र त्या सुदैवाने बचावल्या. त्यात एक महिलेला किरकोळ मार लागला. दिंडोरी शहरात सायंकाळी वाहनाची गर्दी असतानासुद्धा पिकअपचालक वाहन वेगाने चालवित होता. 

दरम्यान चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पिकअपचालक फरार झाला. दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेन मागवत गाडी दूर करत वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलिस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group