जीवलग मित्रांचा वेदनादायी अंत..! भीषण अपघातात अंबड येथील दोन युवक ठार
जीवलग मित्रांचा वेदनादायी अंत..! भीषण अपघातात अंबड येथील दोन युवक ठार
img
Dipali Ghadwaje
सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच  नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेझेफाटा येथे काल (मंगळवारी) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास चारचाकीचा भीषण अपघात  झाल्याची घटना घडली . या अपघातात अंबड येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ,  अंबड गावातील पंकज दिलीप दातीर ( वय ३१) व अभिषेक ज्ञानेश्वर घुले ( ३०) अशी ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. त्यांची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे. या दोन्ही युवकांवर बुधवारी (दि.24) रोजी सकाळी अंबड स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

मयत पंकज हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अधिकारी होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मयत अभिषेक याच्या पश्चात आई, वडील ,बहीण, भाऊ असा परिवार आहे. युवकांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group