भीषण अपघात : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं बेतलं जीवावर ; दोघांचा जागीच मृत्यू ,एक गंभीर जखमी
भीषण अपघात : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं बेतलं जीवावर ; दोघांचा जागीच मृत्यू ,एक गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मुंबईच्या गोराई परिसरात असलेल्या वैराल तलावाजवळील हिल व्ह्यू हॉटेलजवळ आज सकाळी दुचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हे तीनही तरुण सायन कोळीवाडा परिसरात राहणारे असून सहलीसाठी गोराई परिसरात आले होते. तीनही तरुणांनी मद्यप्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती असून दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना तलावाजवळील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बाईक घसरून हा अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की यात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं? 

सायन कोळीवाडा परिसरात राहणारे तीन तरुण सहलीसाठी दुचाकीवरून गोराई परिसरात आले होते. तिघांनीही मद्यप्राशन करून दुचाकीवरून गोराई परिसरात फिरत होते. गोराई येथील वैराग तलावाजवळ आले असता पावसामुळे रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला अपघात इतका गंभीर होता की या अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे जखमेला जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.
 
घटनेची माहिती मिळताच गोराई पोलीस घटनास्थळी दाखल झालं असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं तर मृत तरुणांचं पार्थिव रुग्णवाहिकेच्या मदतीने शवविच्छेदन करण्यासाठी महापालिका रुग्णालयात पाठविले आहेत.

पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मद्यप्राशन आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group