समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या  कारचा भीषण अपघात, कारचा चुराडा, तिघे गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात, कारचा चुराडा, तिघे गंभीर जखमी
img
वैष्णवी सांगळे
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगावनजीक ही घटना घडली.  या अपघातात मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कारचालक असे तिघे गंभीर जखमी झाले.केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकर कडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा मंत्री कारमध्ये नव्हते. 

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांना पोलिसांनी तात्काळ वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. मंत्री प्रतापराव जाधव यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला. ते मुंबईवरून मेहेकरला परत आले. त्यांनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात समृद्धी महामार्गावर माळेगावजवळ झाला. मंत्री प्रतापराव जाधव यांची कार नागपुरवरून मेहेकरच्या दिशेने जात होती. तर मुंबईवरून एक मिनी ट्रक नागपुरकडे जात होता. या ट्रकने महामार्गावर अचानक युटर्न घेतला त्यामुळेे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने थेट ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा चुराडा झाला. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group