दुर्दैवी :
दुर्दैवी : "या" ठिकाणी STF ची गाडी उलटली, २ जवानांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
img
DB
बिहारमधून गुजरातला निघालेल्या एसटीएची गाडी मध्य प्रदेशमध्ये दिल्ली-मुंबई हायवेवर उलटली. या दुर्दैवी अपघातामध्ये दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार , एका जवानाची प्रकृती अतिशय गंभीर आहे, त्याला पुढील उपचारासाठी इंदूरला हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर रतलाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातामध्ये मुकुंद मुरारी विकास कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष कुमार, जिवधारी कुमर, मिथिलेस पासवाल आणि रंजन कुमार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिहार STF चे जवान गुजरातमध्ये एका विशेष मोहिमेसाठी निघाले होते.  त्यावेळीच दिल्ली-मुंबई हायवेवर लेन नंबर ८ वर काळाने घाला घातला अन् गाडीचा अपघात झाला. दोन जणांचा जागीच मृत्य झाला.

अपघाताची माहिती मिळताच रतलामचे एसपी अमित कुमार, एएसपी राकेश यांच्यासह पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group