धक्कादायक ! फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह खदानीत सापडले
धक्कादायक ! फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह खदानीत सापडले
img
दैनिक भ्रमर
कधी कधी अशा काही घटना घडतात की त्या कशा आणि का घडल्या याचा अनुमान लावणे विचारापलीकडे असते, दरम्यान अशीच एक घटना नागपुरात घडली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह खदानीत सापडले धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील हे मृतदेह असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या आहे की दुर्घटना आहे, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागात गर्ग खदानी ही घटना घडली आहे. आज दुपारी पाच जणाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. रोशनी चंद्रकांत चौधरी (वय 32 रा. धुळे) तीचा मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (वय 12),  मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (वय 10वर्षे रा. धुळे),

बहीण रज्जो राऊत (वय 25 रा. नागपूर) आणि  इतिराज अन्सारी (वय 20वर्षे राहणार नागपूर ) अशी मृतांची नावं आहे.  हे पाचही जण रविवार असल्याने त्या भागात फिरण्यासाठी आले होते. पण पाचही जण रात्र झाली तरी घरी परतले नव्हते. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार नागपूर येथील दोन पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदवली होती

या सगळ्यांचा शोध घेत असताना पोलिसांना कुही तालुक्यातील त्या जुना खदानीतील लोकेशन मिळून आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खदानीतून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले.  प्राथमिक दृष्ट्या हे सगळे फिरायला आले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पाचही जणांचा मृत्यू कसा झाला या सगळ्याचा तपास कुही पोलीस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group