गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात अनेक भारतीय, ब्रिटिश आणि इतर देशांचे नागरिक होते. अपघातग्रस्त विमानातून सात मराठी लोकंही प्रवास करत होते. विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल तटकरे यांची भाचेसून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली.
एअर इंडियाचे AI171 विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. हे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ कोसळले. यामध्ये तीन प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सचा समावेश आहे टेकऑफनंतर विमान कोसळल्यानं ही मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान , समोर आलेल्या माहितीनुसार, विमान प्रवासात महाराष्ट्रातून सुनील तटकरेंच्या सुनबाई देखील होत्या. तटकरेंच्या मोठ्या बहिणीच्या सूनबाई आहेत.त्यांची एक बहीण कोल्हापुरात राहते पण त्या सुद्धा दिल्लीत आहेत. अपर्णा महाडिक केबीन क्रू आहे. आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या आज दुपारीची फ्लाईट होती. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडीयामध्ये आहेत. अपर्णा महाडीक ही सुनिल तटकरे यांच्या सुनबाई आहेत. त्या या फ्लाईटनध्ये होत्या. त्या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याची बायको आहेत. ते मुंबईतील गोरेगाव येथे राहत होते
विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच अग्निशमनदलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलंय.. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानामधून 242 प्रवासी प्रवास करत होते, यातील सर्वांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आलीय. दरम्यान प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.