रुग्णासोबत उद्धटपणे बोलणं  भोवलं, आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरचं जागेवर निलंबन
रुग्णासोबत उद्धटपणे बोलणं भोवलं, आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टरचं जागेवर निलंबन
img
नंदिनी मोरे
रुग्णासोबत उद्धटपणे बोलणं एका डॉक्टरला चांगलंच भोवलं आहे. रुग्णांशी असभ्यपणे वर्तन करणाऱ्या डॉक्टरला चांगलीच अद्दल घडली आहे. कारण या डॉक्टरांचं गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जागेवरच निलंबन केले. रुग्णांची कसे वागायचे हे शिकून घ्या, असे सांगत आताच्या आता याला सस्पेंड करा, असे आदेशच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.

राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अथवा रुग्णांशी उद्धट वागू नये. अशा वागणुकीला अजिबात थारा दिला जाणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वारंवार स्पष्ट करूनही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर काही सुधारत नाही.

गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांविषयी आरोग्यमंत्री राणे यांच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. त्यांनी अचानकपणे तेथे भेट देऊन रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्धल माहिती घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान कॅज्युल्टी विभागातील डॉ. रुद्रेश यांच्या वागणुकीबद्दल कळाल्याने त्यांनी चौकशी करून डॉक्टरांचे निलंबन केले.

"रुग्णांशी नीट बोला आणि व्यवस्थित वागा, रुग्णांशी चांगले वागणे बोलणे जमत नसेल तर घरी चालते व्हा..." अशा शब्दात त्यांनी डॉक्टरला खडसावले. यादरम्यान डॉक्टरांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता, चौकशी आयोगासमोर काय उत्तरे द्यायची आहेत ती द्या, माझ्यासमोर एक शब्द बोलू नका.. थेट घरी निघा.. असे आरोग्यमंत्री राणे यांनी खडसावले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group