''या''  माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
''या'' माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
img
नंदिनी मोरे
विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर शिंदे गटाचे बाळ वाढतच चालले असून महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा एका बड्या नेत्याने  शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह नाशिक, अहिल्यानगर, लातूर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अनेक नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मुरकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नीरज मुरकुटे, संचालक संजय छल्लारे, श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच शहापूर तालुक्यातील उबाठा गटाचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे, आसनगावच्या सरपंच नवीना कचरे, उपसरपंच राहुल चांदे आणि पदाधिकारी, खर्डी, सरळाआंबे, अर्जुनली, बोरशेती, वालशेत, काजळ विहीर, पाषाणे, खरांगण या गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच उबाठा गटाचे नगरसेवक आणि समाजकल्याण न्यासाचे उपाध्यक्ष स्वप्नील भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. लातूर शहर, लातूर ग्रामीण विभागातील जयश्री संतोष भुतेकर, सुरेखा गाडेकर, प्रगती डोळसे, दीक्षा प्रतापपूरकर यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना पक्ष आणि महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांवर विश्वास ठेवून अनेकजण आज पक्षपवेश करत आहेत. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी दिलेल्या मतांच्या बळावर महायुती सरकारला लँडस्लाईड कौल मिळाला, मात्र काहीजण त्यावरही आक्षेप घेत आहेत. एकीकडे परदेशात जाऊन आरक्षण जाईल असं म्हणायचं आणि दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करायचा हे चुकीचे आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत जेव्हा जास्त जागा निवडून आल्या, तेव्हा सगळे योग्य होते. मात्र विधानसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह चालले नाही तर निवडणूक प्रकियेवर आक्षेप घेणे हे सर्वस्वी चुकीचे असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच जतमनातचा आदर केला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उरलासुरला जनाधारही निघून जाईल, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group