राजा रघुवंशी हत्या प्रकरणात  पोलिसांचा हादरवणारा   खुलासा
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांचा हादरवणारा खुलासा
img
नंदिनी मोरे
 गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून मेरठ मधील पत्नीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह ड्रम मध्ये डांबलं होता. ही भयानक घटना ताजी असतानाच आता सोनमन या महिलेने हनिमून ला गेल्यावर तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, राजा रघुवंशी असे मृत तरुणाचे नाव आहे.  दरम्यान, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे येत आहे. या प्रकरणात आता आणखी एक खुलासा झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने राजाची हत्या केल्यानंतर एका महिलेची देखील हत्या करण्याचे ठरवले होते. एखाज्याया महिलेला मारून स्कूटीने जाळण्याचा कट रचण्यात आला. जेणेकरून पोलिसांना दिशाभूल करून सोनमलाही मारण्यात आले आहे असे वाटेल,अशी योजना होती. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार राजने सोनमसाठी काळ्या रंगाचा बुरखा, मोबाईल आणि 50 हजार रुपये इंदूरहून आरोपींना दिले होते. हा बुरखा घालून सोनम टॅक्सीने सिलिगुडीला पळून गेली.

आकाशच्या अटकेनंतर राजा आणि सोनम यांनी मिळून एक नवीन योजना आखली. सोनमची गाझीपूरमधील भेट हा प्लानचा पुढचा भाग होता. ज्यामध्ये सोनमला पीडित म्हणून दाखवायचे होते. ठरल्याप्रमाण सोनमने देखील सरेंडरनंतर यूपी पोलिसांसमोर दावा केला होता की काही लोकांनी तिचे शिलाँगमध्ये अपहरण केले. पैशासाठी राजची हत्या केली.

तसेच चौकशी दरम्यान असेही उघड झाले की सोनम तिचा पती राजा रघुवंशी यांच्या हत्येनंतर इंदूरला परतली होती. तिने देवास नाका येथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. सोनम 26 मे ते 8 जून असे 14 दिवस या फ्लॅटमध्ये लपून राहिली. सोनम दिवसभर फ्लॅटमध्येच राहत होते. महत्त्वाचे म्हणजे तिने एक महिन्यापूर्वी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. राज कुशवाह तिला नियमितपणे फ्लॅटवर भेटण्यासाठी येत असे. त्याने सोनमसाठी पाच हजार रुपयांचे रेशनही ऑनलाइन ऑर्डर केले होते. या 14 दिवसात सोनम टीव्हीवर राजाच्या बेपत्ता होण्याशी संबंधित बातम्या पाहत होती.

एवढच नाही तर देवासा नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये 26 मे रोजी रात्री तिच्या प्रियकरासोबत देवास नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये राहिली. 26 मे रोजी रात्री 2.19 वाजता एक जोडपे हॉटेलमध्ये आले. त्यांनी त्यांचे नाव आकाश शर्मा-अंजली असे सांगितले. त्यांचे आधार कार्ड गोविंद नगरचे होते. ते नाव बदललेले जोडपे सोनम आणि राजा असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजाच्या हत्येचा सूत्रधार सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह आहे. राजा आणि सोनमने लग्नाच्या 11 दिवस आधी हत्येची योजना आखली होती. विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी हे तिघेही आरोपी 19 मे रोजीच शिलाँगला पोहोचले होते. योजनेनुसार, सोनम तिचा पती राजाला फोटोशूटच्या बहाण्याने खंदकाच्या वरच्या भागात घेऊन गेली. ही हत्या रात्री 2 वाजता झाली. आरोपी तेथून 2.18 वाजता निघून गेला. म्हणजेच हत्या करण्यासाठी फक्त 18 मिनिटे लागली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group