पालकांना मोठा दिलासा !   वह्या-पुस्तकांच्या किमतीत मोठी घट
पालकांना मोठा दिलासा ! वह्या-पुस्तकांच्या किमतीत मोठी घट
img
नंदिनी मोरे
जून महिन्यापासून शाळा सुरु होते. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरु झाली आहे. नवीन वर्ष म्हंटल की सर्वच साहित्याची तसेच वह्या पुस्तकांच्या खरेदीला आता सुरुवात झाली आहे. शाळेची सुरुवात म्हंटल की पालकांना मोठा खर्च असतो, परंतु आता पालकांना दिलासा मिळेल अशी एक बातमी समोर आली आहे. 

यंदा सर्वच वह्या-पुस्तकांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री बसणार नाही. पण वह्या-पुस्तकांच्या किमतीत घट का झालीये? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनील अजमेरा यांच्याकडून जाणून घेऊ.

गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाठ्यपुस्तक आणि वह्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट झालेली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजेच कागदाच्या किमती कमी झाल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या आणि वह्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच गाईड्सच्या किमतीत देखील घट झाली आहे. पूर्वी नवनीत कंपनीची वही 60 रुपयाला यायची ती आता 55 रुपयाला येत आहे, असे अजमेरा यांनी सांगितले.

नवनीत प्रमाणे सर्वच कंपन्यांच्या वह्या स्वस्त झाल्या असून, 5 ते 7 रुपयांपर्यंत एका नगाच्या किमतीत फरक पडला आहे. वह्या-पुस्तकांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, सर्व वह्या-पुस्तके खरेदी करता येणार आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group