नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): सहा वर्षाच्या चिमुकलीला मारून उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्याच कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या स्वप्निल गायकवाड वय 34 यांनी आपल्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून करून गळफास घेत आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी पोलिस अंमलदार स्वप्निल गायकवाड याचे पत्नीसोबत वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेतला होता.
नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.