अलीकडे राज्यात बिबट्यांचा लोकवस्तीवरील वावर वाढला आहे. बिबट्याचा मुक्त संचार तसेच बिबट्यांचा हल्ला अशा अनेक घटना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडले असलयाचे समोर आले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे निदर्शनास आले आहे .दरम्यान, आता चांदवडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.
चांदवड भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घराबाहेर झोपलेल्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. घराबाहेर झोपलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून केले गंभीर जखमी केले आहे.
सुशीलाबाई कहाडळ असे या महिलेचे नावं असून त्या घराबाहेर झोपलेल्या असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना ओढत घेऊन जात होता त्यांच्या नातूने पहिल्यानंतर त्याने आरडाओरडा केल. त्यामुळे बिबटयाने या महिलेला सोडून धूम ठोकल्यामुळे महिलेचा जीव वाचला. या महिलेला चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबटया नरभक्ष झाला असून त्याला तातडीने पकडण्यात आले नाही तर तो आणखी अनेकांचा जीव घेईल त्यामुळे त्याला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वनविभागावर रोष व्यक्त केला आहे. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरांवर हल्ले होत आहे. मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.