विमान अपघातात शोकसभेला निघालेल्या नागपूरच्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू
विमान अपघातात शोकसभेला निघालेल्या नागपूरच्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू
img
नंदिनी मोरे
अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला असल्याची अतिशय धक्क्कादायक घटना घडली आहे. या घटनेंन संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या विमान अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश आहे. अशातच नागपूरमधील एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सासऱ्या शोकसभेला लंडनला जाण्यासाठी निघाले होते पण वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.

नागपूरमधील क्वेटा कॉलनीत राहणारे मनिष कामदार यांची मुलगी यशा कामदार, त्यांचा मुलगा रुद्र कामदार आणि सासू रक्षा मोढा यांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  अहमदाबाद विमान अपघाताची माहिती कळताच दुपारी ३ वाजता कामदार कुटुंबीय अहमदाबादला रवाना झाले आहे.

'यशा कामदार यांचे सासरे हे उपचारासाठी अहमदाबादला आले होते. ते लंडनला राहणारे होते. कॅन्सरचं उपचार घेत असताना त्यांचं निधन झालं होतं. लंडनला त्यांच्या ओळखीतील लोकांनी शोकसभा आयोजित केली होती. त्या शोकसभेसाठी सगळे लंडनला निघाले होते. यशा कामदार आणि त्यांचा मुलगा व यशा कामदार यांची सासू असे तिघे जण हे लंडनला चालले होते. यशा कामदार यांचे सासरे हे लंडनला व्यवसाय करत होते. व्यवसाय गुंडाळून ते अहमदाबादला आले होते' अशी माहिती कामदार यांच्या शेजाऱ्यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group