काही लोकांची कृती आणि मानसिकता इतकी विकृत आणि विश्वास न बसणारी असते. काही लोक प्राणिमात्रांवर जीवापाड प्रेम करणारी आणि दयाळू वृत्तीचे असतात. परंतु काही लोक मात्र याच्या अतिशय विरुद्ध अतिशय क्रूर आणि विकृत बुद्धीचे जे प्राण्यांना काहीही समजत नाही. दरम्यान, आतापर्यंत अनेकदा प्राण्यांसोबत अतिशय क्रूर व्यावहार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा एका इसमाचा क्रूर पण समोर आला आहे. या व्यक्तीने चक्क एका मांजराला 9 व्या मजल्यावरून फेकल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
मुंबईतील एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका बिल्डींगमध्ये राहणाऱ्या माणसाने 9 व्या मजल्यावरून एका मांजराला थेट खाली फेकल्याचं दिसत आहे. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे अतिशय थंड डोक्याने केलेल्या या कृतीनंतर त्या इसमाने शांतपणे खाली वाकून ते मांजर पडलं की नाही याचीही खात्री केली. त्या बिल्डींगमध्ये 9 व्या मजल्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या घटनेत त्या बिचाऱ्या मुक्या जीवाचा, पाळीव मांजराचा हकनाक बळी गेला.
मिळालेल्या माहितीनुसापर, मालाडच्या मालवणी परिसरातील एक बिल्डींगमध्ये ही भयानक घटना घडली असून खाली फेकलं गेल्याने अवघ्या 15 महिन्यांचे ते पाळीव मांजर मृत्यूमुखी पडलं. रिपोर्टनुसार, कासम सय्यद असे त्या इसमाचं नाव असून तो याच इमारतीमधील रहिवासी आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्या नराधमाच्या या कृत्याने संताप व्यक्त होत असून मांजराच्या गेलेल्या जीवासाठी हळहळ व्यक्त होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.
या घटनेचं शॉकिंग सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झालंय. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सुरुवातीला खिडकीजवळील बुटांच्या रॅकवर एक मांजर उभी असल्याचं दिसलं. थोड्या वेळाने, एक माणूस बॅग घेऊन तिथे आला, मांजरीकडे पाहिलं आणि पुढे गेला. मात्र त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सगळेच हादरले.
पुढे जाऊन त्याने बॅग खाली ठेवली, लिफ्टचं बटण दाबलं पण अचानक तो मागे फिरला, रॅकवर उभ्या असलेल्या मांजराजवळ गेला, त्याने आधी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला उचललं आणि त्यानंतर त्याने शेजारीच असलेल्या खिडकीतून त्या मांजराला धाडकन खालीच फेकून दिलं. यामुळे ते मुकं जनावर मेटल शीटवर आपटलं आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी कासम सय्यदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून प्रत्येक यूजर हळहळत आहे, त्या मुक्या जनावरला न्याय मिळवून देण्यासाठी त्या नराधम आरोपीवर कठोर कारवाई करत कडक शिक्षा देण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.