मनसेच्या ''या'' नेत्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक !
मनसेच्या ''या'' नेत्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक !
img
दैनिक भ्रमर
मनसे कामगार सेनेचे चिटणीस सुजय ठोंबरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मुंबईतील आझाद मैदानात पोलिसांनी सुजय ठोंबरेला अटक केली आहे. त्याला १० लाखांची खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याने अपहरणासाठी वापरलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय ठोंबरे आणि अन्य 4 जणांनी मिळून पांडुरंग मोरे नावाच्या एका कंपनीच्या मालकाचे अपहरण करत त्याच्याकडे खंडणी मागितल्या आरोप करण्यात आला आहे. पांडुरंग मोरे यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांना धमकी देत मनसे दादर कार्यालयात घेऊन जातोय, असे सांगण्यात आले. यावेळी तडजोडीसाठी 10 लाख द्या, अशी मागणी करण्यात आली. यामुळे आता आझाद मैदान पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group