सध्या खाजगी शाळेने आपली मनमानी कारभार सुरू केले असून अनेक शाळेंचे मनमानी कारभार समोर येत आहेत. दरम्यान, भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अतिरिक्त शुल्काची तक्रार केल्यानं सात विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडली आहे. खाजगी शाळेची मुजोरी समोर आली आहे. बेकायदेशीर शुल्क आकारल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलीय. तुमसर रोड येथील फादर अँगल शाळेचा प्रताप समोर आल्यानंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बालकांना मोफत सक्तीचा अधिनियम 2009 अन्वये सर्व बालकांना शिक्षण घेण्याचा अधिकार असताना सुद्धा तुमसर तालुक्यातील फादर अँगल खाजगी शाळेने सात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे काही कारण नसताना शाळेतून अचानक काढण्याची घटना घडली आहे. सध्या खाजगी शाळेने आपली मनमानी कारभार सुरू केला आहे. पालकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे दिली होती. त्याचा राग धरत शाळा प्रशासनाची त्यांच्या मुलाना शाळेतून काढून टाकलं आहे.
शाळेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून शाळा प्रशासन आपल्या मनमर्जीने कारभार चालविला आहे. आता या प्रकरणी शिक्षण विभागाला सुद्धा पत्र व्यवहार करण्यात आला असून याचा खुलासा शाळेनी करावा अन्यथा शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा शिक्षणं विभागाने दिला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हयात खाजगी शाळेची दादागिरी वाढली आहे. आता अशा शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.