Nashik : 17 वर्षीय युवकाची आत्महत्या; चिट्ठीतून समजले कारण
Nashik : 17 वर्षीय युवकाची आत्महत्या; चिट्ठीतून समजले कारण
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जायखेडा येथील पती-पत्नीने युवकासह त्याच्या आई-वडिलांना मारहाण व दमदाटी केली. ही मारहाण सहन न झाल्याने जायखेडा येथील अभिजित संजय मोहिते (वय 17) याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी माझ्या मृत्यूस मारहाण करणारे संदीप सूर्यवंशी व शीतल सूर्यवंशी हे दोघे जबाबदार आहेत, अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली होती.

त्यावरून जायखेडा पोलिसांनी संदीप सूर्यवंशी (वय 44, रा. जायखेडा) यास अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्यादी मोहिते यांच्या तक्रारीवरून जायखेडा पोलिसांनी बीएनएस कलम 108, 115 (2), 352, 351 आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group