अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, केस लढण्यास सरकारी वकील अजय मिसरांचा नकार, कारणही सांगितलं, म्हणाले...
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, केस लढण्यास सरकारी वकील अजय मिसरांचा नकार, कारणही सांगितलं, म्हणाले...
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि अनेक बड्या राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे. एसआयटीच्या कसून चौकशीत खरातचे अनेक कारनामे समोर आले आहेत. दरम्यान,  खरात याला आज पुन्हा जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मात्र अशोक खरातविरोधातील आजच्या सुनावणीआधी एक मोठी घडामोड घडली आहे. 



सरकारी वकील अजय मिसर यांनी अशोक खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दाखवली आहे. एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे. 2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला,रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत. 

दरम्यान, शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला चौकशीसाठी एसआयटी बोलविण्याच्या तयारीत असताना ती फरार झाली.अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याने पथकाने अशोक खरात याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group