खरात प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; पत्नीला दिलासा नाही
खरात प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; पत्नीला दिलासा नाही
img
Nandini khandare More


चर्चेत असलेल्या अशोक  खरात  प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहेत. या प्रकरणात त्यांची पत्नी कल्पना यांचे नावही जोडले गेल्याने तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसत आहे.अशोक खरात यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाकडून त्यांना तात्काळ कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी मे महिन्याच्या अखेरीस निश्चित करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

कल्पना खरात यांनी अटकेच्या भीतीने छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने आजच्या सुनावणीत खरात यांना दिलासा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

तसेच,  खरात यांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी काही जुन्या निकालांचे संदर्भदेण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर पळवाटा आणि पूर्वीच्या काही सारख्या प्रकरणांमधील न्यायालयाच्या निर्णयांचा आधार घेत जामीन मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. परंतु, न्यायालयाने हे संदर्भ ग्राह्य धरले नाहीत आणि तूर्तास जामीन अर्जावरील पुढील प्रक्रिया स्थगित ठेवली.दरम्यान , न्यायालयाने हे जामीन प्रकरण आता तहकूब केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ते ३० मे दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत कल्पना खरात यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group