नाशिक : दोघा भावंडांनी चोरले घरातील तीन तोळ्यांचे दागिने
नाशिक : दोघा भावंडांनी चोरले घरातील तीन तोळ्यांचे दागिने
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरात वयोवृद्ध जोडपे असल्याचा फायदा घेऊन दोघा भावांनी कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा लोटा असा एकूण 24 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना पंडित कॉलनीत घडली.

फिर्यादी सुजाता योगेश चोपडा (रा. जुनी पंडित कॉलनी, राजयोग बंगला, नाशिक) यांचा आरोपी सागर भीमराव मोहिते व आकाश भीमराव मोहिते (रा. नगावबारी, ता. जि. धुळे, मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी विश्‍वास संपादन केला. फिर्यादी यांचे सासू-सासरे वयोवृद्ध असल्याचा फायदा घेऊन आरोपी मोहिते बंधूंनी घरातील वॉर्डरोब उघडून त्यात असलेल्या 7 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 8 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 8 लाख 10 हजार रुपये किमतीचा 9 तोळ्यांचा सोन्याचा हार, 5 लाख 40 हजार रुपये किमतीची सहा तोळ्यांची गळ्यातील चेन, 1 लाख 35 हजार रुपये किमतीच्या दीड ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 1 लाख 80 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांचे कानातील सोन्याचे झुबके, 40 हजार रुपये किमतीचा 400 ग्रॅम वजनाचा एक चांदीचा लोटा, असा एकूण 24 लाख 25 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group