भयंकर !  सहा महिन्यांच्या बाळाला उंदीर खात होते, शरीरावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदीर चावल्याच्या खुणा, काय आहे प्रकरण
भयंकर ! सहा महिन्यांच्या बाळाला उंदीर खात होते, शरीरावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदीर चावल्याच्या खुणा, काय आहे प्रकरण
img
दैनिक भ्रमर
पालक आपल्या मुलांना तळहातावरील फोडा  प्रमाणे जपत असतात. त्यांच्या जन्मापासून ते आपलं सर्वस्व आपल्या मुलांसाठी देत असतात. पण काही पालक आणि त्यांची वागणूक अविश्वसनीय असते. आपण त्यांचा वागणुकीवर आपल्याला विश्वास ठेवणे कठीण वाटते. अशीच एक घटना अमेरिकेत गफहहडळी आहे. 

एका सहा महिन्यांच्या बाळाला चक्क उंदरांनी खाल्ले असल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे. या प्रकरणी बाळाच्या वडिलांना कोर्टाने 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  या बाळाच्या शरीरावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदीर चावल्याच्या खुणा आढळल्या होत्या. त्यानंतर त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली व आता न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.अमेरिकेच्या इंडियाना राज्यात ही  घटना घडली आहे. 

 या व्यक्तीने आपल्या बाळाला उंदरांसोबत ठेवले होते. मूल पाळणामध्ये झोपले होते आणि उंदीर त्याला जिवंत खात होते. मुलाच्या एका हाताचा तळवा आणि पाचही बोटांचे मांस उंदरांनी खाऊन टाकले होते. जेव्हा मूल अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले, तेव्हा या निष्काळजी वडिलांनी मदत मागितली. ही घटना सप्टेंबर 2023 मध्ये घडली होती.

उंदराच्या चाव्याव्दारे मुलाचे शरीर ‘कायमचे विद्रूप’ झाले होते. डेव्हिड शोनाबॅमने आपल्या मुलाला पाळीव कुत्र्यासोबत ठेवले होते. सप्टेंबर 2024 मध्ये डेव्हिडला बाळाकडे दुर्लक्ष करणे आणि इतर तीन गंभीर आरोपांसाठी दोषी ठरविण्यात आले होते. आता 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्याला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुलाची आई, एंजल शोनबॉमलाही या महिन्याच्या अखेरीस शिक्षा सुनावण्यात येणार आहे. घरात तीन मुलांना उंदीर चावले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group