माऊली लॉन्स जवळील श्री ज्वेलर्समधील दरोड्यातील आरोपीला अटक; दोघे फरार
माऊली लॉन्स जवळील श्री ज्वेलर्समधील दरोड्यातील आरोपीला अटक; दोघे फरार
img
दैनिक भ्रमर
नाशिक -  अंबड परिसरातील कामटवाडे रोड वर सोमवारी झालेल्या सोनाराच्या दुकानावरील दरोडा प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती गुन्हे शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी दीड वाजेच्या सुमारास कामटवाडे रोडवर माऊली लॉन्सच्या जवळ श्री ज्वेलर्स या ठिकाणी घोडके पती-पत्नी हे दुकानात बसलेले असताना तोंडाला रुमाल बांधून 2 इसम दुकानामध्ये आले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते.

या घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक करत असताना मिळालेल्या माहितीवरून सिन्नर फाटा परिसरात या प्रकरणातील संशयित आरोपी निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार (रा. नंदन अपार्टमेंट, दत्तनगर, चुंचाळे) हा काळा रंगाच्या बुलेट गाडीवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस कर्मचारी महेश साळुंके, विशाल काठे, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिदसिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सिन्नरफाटा येथे सापळा रचला होता.

ज्यावेळी बेलदार या ठिकाणी आला त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बुलेट सह त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 44.580 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले असून त्याची किंमत 5 लाख 40 हजार 225 रुपये असून बेलदारने गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. त्याचे अन्य दोन साथीदार हे फरार असून त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे दोन पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. 

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, महेश हिरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस कर्मचारी महेश साळुंके, विशाल काठे, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, कैलास चव्हाण, रोहिदास लिलके, रविंद्र आढाव, धनंजय शिंदे, विशाल देवरे, मिलिदसिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख,

आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस निरीक्षक मनिषा सरोदे, उपनिरीक्षक किरण शिरसाठ, सुक्राम पवार, समाधान पवार व गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ कडील पोलीस कर्मचारी नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, मनोहर शिंदे, किरण आहेरराव, अतुल पाटील, महेश खांडबहाले, तेजस मते यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group