मोठी बातमी !  गर्भवती महिलेला उपचारास नकार देणाऱ्या 'दीनानाथ' च्या डॉ. घैसास यांचा राजीनामा
मोठी बातमी ! गर्भवती महिलेला उपचारास नकार देणाऱ्या 'दीनानाथ' च्या डॉ. घैसास यांचा राजीनामा
img
दैनिक भ्रमर
पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलं आहे. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. तनिषा भिसे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान , पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. तसेच,  दीनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर प्रचंड टीका होत होती. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही रद्द व्हावे, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातून दबाव वाढल्यानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून डॉ सुश्रुत घैसास सेवा करीत होते. मात्र तनिषा भिसे प्रकरणात उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रमुख आरोप त्यांच्यावरच ठेवण्यात आला होता. तनिषा भिसे यांचे उपचार डॉ. घैसास यांच्याकडेच सुरू होते. मात्र प्रसूतीवेळी १० लाखांची मागणी करून उपचारास नकार दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आरोपावरून संतापलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांच्या आई वडिलांच्या रुग्णालयाची देखील तोडफोड केली होती. या सगळ्या प्रकरामुळे डॉ. घैसास व्यथित होते.

हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. घैसास यांनी आपला राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे.डॉ घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र दुसऱ्या बाजूला आहेत तेवढे पैसे भरून उपचार सुरू करू, असे रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना सूचना केल्याची बाजू संपूर्ण वादानंतर डॉ. घैसास यांनी मांडली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group