शिक्षकाचा प्रताप  ! पेट्रोल पंपाजवळ निवांतपणे गांजाचं सेवन, कुठे घडली घटना ?
शिक्षकाचा प्रताप ! पेट्रोल पंपाजवळ निवांतपणे गांजाचं सेवन, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
 
सिंधुदुर्ग मधून एक धकाकदायक घटना समोर आली आहे. आपल्या देशाचं भवितव्य असणारे आजचे विद्यार्थी घडविनयचे काम शिक्षक करत असतात. मुलांना वाईट सवयी लागू नये. त्यांनी चांगल्या मार्गावर चालावे यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. पण याच शिक्षकांच्या पेशाला  काळिमा फासणार कृत्य एका शिक्षकाने केले आहे. सिंधुदुर्गमध्ये एक शिक्षक महाशय भर रस्त्यावर निवांतपणे गांजा ओढत असल्याचं आढळून आलंय. अखेरीस पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये ही घटना घडली आहे. गांजा सेवन करताना कुडाळ पोलिसांनी चक्क एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई रात्री उशिरा मुंबई-गोवा महामार्गावर झाराप पेट्रोल पंपावर करण्यात आली. विनायक रामचंद्र पाटील (वय ३४, मूळ रा. चंदगड) असं या शिक्षकाचं नाव आहे. तो सध्या सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

मुंबई गोवा महामार्ग लगत असलेल्या झाराप पेट्रोल पंपावर सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी जेव्हा विनायक पाटील याची चौकशी केली असता तो शिक्षक असल्याचं समोर आलं. शिक्षकच गांजा ओढत असल्याचं पाहून पोलीसही अवाक् झाले. या प्रकारणी कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group