जळगाव जिल्ह्यात काल म्हणजेच बुधवारी पुष्पक एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेनं घाबरून काही प्रवाशांनी चेन खेचून रेल्वे थांबवली आणि या गदारोळात घाबरलेल्या काही प्रवाशांनी रेल्वेतून उतरले याच वेळी समोरील ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत अनेक जण चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेत भिवंडीतील जयगडी आणि पुण्यातील विश्वकर्मा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या दोन्ही कुटुंबातील नऊ सदस्य नेपाळवरून लखनऊला येऊन तेथून पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणकडे येत होते मात्र रस्त्यात झालेल्या अपघातात या कुटुंबातील 4 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयकला जयगडी या 60 वर्षीय महिला मूळच्या नेपाळ देशातील आहेत. त्यांचा मुलगा भिवंडीतील इमारतीवर वॉचमन म्हणून काम करत असून येथेच ते कुटुंबीयांसह राहत आहे. जयकला या भिवंडी येथे आपल्या नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी आणि आपल्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी येत होत्या. भिवंडीत येऊन प्रथमच येऊन नातवंडांना भेटणाऱ्या आजी जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता.पण त्यानंतर फोन आला तो त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमी. आपली आजी भेटणार यामुळे भिवंडीतील जयगडी कुटुंब आनंदी असतानाच आजीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि जयगडी कुटुंबावर एकच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.