नाशिक : एका इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागून मीटर बॉक्स जळून पूर्ण खाक झाल्याची घटना सातपूर परिसरातील सोमेश्वर कॉलनी परिसरात घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमेश्वर कॉलनीत हॅपी रेसिडेन्सी नावाची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या तळ मजल्यावर मीटर बॉक्सला आज दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. तोपर्यंत माती व रेतीने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याचे समजताच बिल्डिंग मधील नागरिकांची तारांबळ उडाली.
बिल्डिंग मध्ये वरच्या मजल्यावर 2 वयस्कर महिला घाबरलेल्या अवस्थेत होत्या. अग्निशमन दलाचे जवान येताच त्यांनी दोघींना सुखरूप खाली आणले व आग पण विझवली. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज स्थानिक नागरिकांचा आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.