भीषण ! आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी  जागीच  ठार
भीषण ! आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार
img
दैनिक भ्रमर
अपघातांच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत चालली आहे. दरम्यान, अशाच एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण  यात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. दिंडोरी-वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कारमध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पती-पत्नी जागीच ठार झाले. तर मुलगी गंभीर जखमी झाले आहे. जखमी मुलीला  तातडीने खाजगी रुग्णालयात करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथील वजन काट्यासमोर कार क्रमांक (एमएच ०१ डीवाय ०६९१) व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांंक (एमएच ०५ एफ.जे ८१८८) यांच्यात भीषण अपघात झाला. 

मिळालेल्या  माहितीनुसार, करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे (४३) , पत्नी सुरेखा सतीश बर्डे (४०) व मुलगी समृध्दी सतीश बर्डे (१७) हे तिघे कारव्दारे निळवंडी येथून नातेवाईकाकडून आपल्या करंजवण  गावी परतत असतांना सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काट्याजवळ समोरुन येणारी आयशरशी धडक होत त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, त्यांना नाशिक  येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती-पत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मुलगी समृध्दी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यातअपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहे. यावेळी करंजवण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

तसेच, करंजवण गावावर शोककळा करंजवण येथे सतीश बर्डे दांपत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककळा पसरली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group