विकृतीचा  कळस ! नराधमाचा कुत्रीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडली घटना ?
विकृतीचा कळस ! नराधमाचा कुत्रीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
मानसिक विकृतीची अनेक उदाहरणे अनेकदा समोर येत असतात. यातील काही उदाहरणे म्हणजे अगदी किळसवाणी आणि संताप निर्माण करणारी असतात.  दरम्यान , लैंगिक विकृतीने कळस गाठला असून ‘पिसाट’ कधी काय करतील याचा नेम राहिलेला नाही. ‘कामातुरानां न भयं न लज्जा’ अशी म्हण प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय आला हडपसरमधील एका घटनेने आला असून या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

लैंगिक विकृतीने कळस गाठला एका विकृत व्यक्तीने श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही  धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. 

हलीमुद्दीन शेख (रा. हांडेवाडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहण्यास आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुत्री पाळीव आहे. तिचा मालक कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता. त्यावेळी आरोपीने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केले. कुत्रीचा मालक घरी आल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये त्यांना अचानक बदल जाणवू लागले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी घरामधील  सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी हा घृणास्पद प्रकार प्रकार समोर आला. या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे.

कुत्रीच्या मालकाने या घटनेची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह स्थानिक नागरिकांना दिली. पळसकर आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group