सरकारी कामांसाठी मंत्रालयात जाताय? मग आधी ही बातमी वाचा, सरकारकडून नवीन नियमावली जारी
सरकारी कामांसाठी मंत्रालयात जाताय? मग आधी ही बातमी वाचा, सरकारकडून नवीन नियमावली जारी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा सुरक्षा जाळीवर उडी मारण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गृह विभागाकडून नवी मार्गदर्शक नियामवली जारी करण्यात आली आहे. या पुढे मंत्रालयात जाणाऱ्या व्यक्तीची कडक तपासणी केली जाणार आहे. तसंच जाळीवर उडी मारू नये म्हणून आधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. एवढंच नाहीतर ड्रोनने सुद्धा नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारण्याच्या वाढत्या घटना आणि मंत्रालयातील वाढती गर्दी नियंत्रणात आणण्याकरिता गृहविभागाने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.

यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मंत्रालयात वारंवार येणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासंदर्भात पोलिसांकडून एक यादी तयार केली जाणार असून, त्याचा सविस्तर अहवाल प्रत्येक महिन्याला सरकारला सादर करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. या अहवालात वारंवार येणाऱ्यांची कारणमिमांसा केली जाणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. याअगोदर दरदिवशी जवळपास साडेतीन हजार अभ्यागत विविध कामांसाठी येत असत. आता हा आकडा पाच हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्यातच विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे.  या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मंत्रालयातील प्रवेशाबाबत गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

यात आता मंत्रालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रवेशाकरिताही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीएनएस यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मंत्रालयाजवळ सध्या मेट्रो सब वेचे काम सुरू आहे. यामधून अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणीही सुरक्षातपासणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काही कर्मचारी अनेकवेळा कार्यालयीन वेळेनंतर मंत्रालयात येतात. यासाठी त्यांना यापुढे सचिवांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

मंत्रालयात प्रवेशपत्रिका देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री कार्यालयात एका विशेष कार्यअधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी शिफारस केल्यानंतरच अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, अभ्यागतांच्या आणि वाहनांच्या प्रवेशासाठी यापुढे फोन किंवा तोडीं सूचना स्वीकारण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, मंत्रालयात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहनांना प्रवेश देताना आता संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यात प्रामुख्याने वाहनांसाठी आरएफआयडी टॅगसह एनपीआर कॅमेरा आणि बूम बॅरिअर बसविण्यात येणार आहे. 

अशी आहे मंत्रालयाची मार्गदर्शन नियमावली : 
  • मंत्रालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांची संख्या 5000 पेक्षा जास्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या असून एका महिन्याच्या आत त्यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.   
  •  15 दिवसात ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयात यापुढे मंत्री आणि सचिव यांच्या गाड्यांना प्रवेश राहील तर खाजगी गाड्यांसाठी योग्य ती परवानगी घेऊनच प्रवेश दिला जाणार आहे.
  •  मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना  स्वरुपाची प्रवेश पत्रिका देण्याची कार्यवाही सुरू आहे. जो पर्यंत स्वरुपाचे प्रवेश पत्रिका देण्याची कार्यवाही देण्याची कार्यवाही सुरू होत नाही, तो पर्यंत मंत्रालयामध्ये प्रत्येक मजल्यासाठी कलर कोड पत्रिका देण्याची व्यवस्था मंत्रालय सुरक्षा विभागामार्फत करण्याची सूचना देण्यात आली आहे.
  • अभ्यागतांना कार्यालयीन वेळेनंतर मंत्रालयामध्ये थांबू न देण्याच्या सूचना करण्यात आली आहे.
  •   मंत्रालयात बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये जेवणाचे डबे हे वगळण्यात आले आहेत.
  •  मंत्रालय अंतर्गत आणि बाह्य परिसराची सीसीटीव्ही मार्फत सतत निगराणी ठेण्यात येईल. संरक्षक जाळी ओलांडून प्रवेशाचा प्रयत्न होत असल्यास त्याबाबत अलर्ट संदेश देणारी कार्य प्रणाली पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा यांनी एक महिन्यात कार्यन्वित करण्यात येणार आहे. 
  •  मेट्रो सब वे येथे सुरक्षा तपासणी कक्ष उभारण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांची सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे तपासणी केली जाणार आहे.
  •   मंत्रालयाच्या टेरेसवर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात येणार
  •   मंत्रालयाच्या मोकळ्या कॉरिडॉरमध्ये खिडक्यांमधून किंवा प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या जागांमधून उडी मारण्याचा प्रयत्न अभ्यागतांमार्ग होऊ शकतो. अशा ठिकाणी लावण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिन्यात करण्याच्या सूचना.
  •   मंत्रालय परिसरात पाळीव प्राण्यांना प्रतिबंध करण्यात आलं आहे.
  •   मंत्रालयामध्ये प्रवेश करण्याऱ्या अभ्यागतांनी त्यांच्यासोबत दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येणार आहे.
  •   वारंवार मंत्रालयात प्रवेश करण्याची कारणमिमांसा यादी तयार केली जाणार.
  •  मंत्रालयामध्ये आप्ताकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन वाहन तातडीने प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था मंत्रालय सुरक्षा कक्षाने कार्यान्वित करावी
  •  मंत्रालय सुरक्षेसाठी कार्यन्वित असलेली Drone यंत्रणा सुस्थितीत ठेण्याबाबत सूचनाही गृह विभागाने दिल्या आहेत
इतर बातम्या
Join Whatsapp Group