मोठी बातमी : मंत्रालयात दुर्घटना , सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं
मोठी बातमी : मंत्रालयात दुर्घटना , सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं
img
Dipali Ghadwaje
 मंत्रालयात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे मंत्रालयात कुठलीही दुर्घटना होणार नाही, नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतलं जाणं अपेक्षित आहे. अशातच  आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार  मंत्रालयात आज सकाळी एक दुर्घटना घडली.  आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही. पण यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असताना. रुग्णाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी लोक इथे येत असतात. याच ठिकाणच सिलिंग कोसळलं.

 जे सिलिंग कोसळलं, ते गंजलेलं लोखंड होतं. त्यामुळे सिलिंगचा हा भाग कोसळला. जो ढिगारा खाली आला, तो सफाई कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवला.  दरम्यान या घटनेमुळे मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मंत्रालयातून महत्त्वाचे निर्णय होत असतात. मंत्रालय प्रशासनाचा कणा आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांची कार्यालय मंत्रालयात आहेत. अशातच या घटनेमुळे विविध चर्चांना आता उधाण आले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group