विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे.
त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले.
काही कागदपत्र त्यांनी फेकून दिले आहेत. मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत मात्र ते देखील आम्हाला भेट देत नाहीत. जर असे होत नसेल तर आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा इशारा झिरवाळ यांनी दिला होता.