राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. अशातच उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण या दोनही पक्षांचे माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये धुळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत.
उद्या 1 जुलै 2025 रोजी हा पक्ष प्रवेश पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे.