महाराष्ट्र उद्या अजितदादांना अखेरचा निरोप देणार ! पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार
महाराष्ट्र उद्या अजितदादांना अखेरचा निरोप देणार ! पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीला जाताना अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनचा अपघात झाला. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या (दि.२९) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे बारामती येथे येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. 

अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाईल.

अजित पवार यांचे केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत होते. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले असून, उद्या ते स्वतः बारामतीत येऊन पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा आणि देशातील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि 'नो फ्लाय झोन' लागू करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group