अजितदादांनी महायुतीपुढे ठेवली अट : म्हणाले विधानसभेला कमी जागा घेण्यास तयार, पण उपमुख्यमंत्री पद अन्…....
अजितदादांनी महायुतीपुढे ठेवली अट : म्हणाले विधानसभेला कमी जागा घेण्यास तयार, पण उपमुख्यमंत्री पद अन्…....
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. जागा वाटपावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहेत. महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतांनाच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जास्त जागांवर दावा ठोकण्यापासून माघार घेतल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी जागा घेईल. मात्र महायुतीची सत्ता आली तर पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद देण्यात यावे, अशी अट त्यांनी ठेवल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळं महायुतीच्या जागावाटपात पक्षाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता आहे. वस्तुस्थिती लक्षात घेऊन अजित पवार यांनीही जागावाटपाच्या मुद्द्यावर तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. 

राज्यात ऑक्टोबरच्या मध्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यानुसार महायुतीने जमीन वाटपाची चर्चा सुरू केली आहे. भाजप 140 हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारच अल्प जागांवर जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेषत: अजित पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात कमी जागा घेण्यास अजित पवार तयार आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी अट ठेवली आहे. निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास आपल्याकडील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद कायम ठेवण्याची अट त्यांनी ठेवल्याचं या नेत्याने सांगितलं.एका वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group