महायुतीचा शपथविधी ''या'' तारखेला पार  पडण्याची शक्यता
महायुतीचा शपथविधी ''या'' तारखेला पार पडण्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
राज्यातील विधासभा निवडणुकीत महायुती सरकारचा दणदणीत विजय झाला असून आता महायुती सरकारमध्ये सत्ता स्थापनेचा हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आता   शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांची गटनेतेपदी निवड केली आहे, पण भाजपचा निर्णय अजून झालेला नाही.
तर भाजपच्या गटनेत्याची निवड 28 किंवा 29 नोव्हेंबरला होणार आहे. 

तसेच, 28 तारखेला भाजप आमदारांना मुंबईमध्ये येण्याचा निरोप मिळण्याची शक्यता आहे. यानंतर 29 तारखेला भाजपच्या सर्व विजयी आमदारांची बैठक होईल आणि याच बैठकीत नेता निवड होईल. नेता निवडीनंतर 2 तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान  एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदी भाजपचा नेता असावा, अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group