महादेव मुंडे यांच्या पत्नीकडून विष प्राशन ; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उडाला गोंधळ
महादेव मुंडे यांच्या पत्नीकडून विष प्राशन ; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उडाला गोंधळ
img
Dipali Ghadwaje
गेल्या अनेक दिवसांपासून  बीड जिल्हा तूफान चर्चेत आहे.  महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही. 18 महिन्यांपूर्वी हा खून झाला होता. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, म्हणून त्यांच्या पत्नीने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करुन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार , बेशुद्धअवस्थेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बॉटलमध्ये नेमकं कुठलं औषध होतं याची माहिती नाही.

ज्ञानेश्वरी मुंडेंवर इमर्जन्सी वॉर्ड मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.  ज्ञानेश्वरी मुंडेंना अति दक्षता विभागात हलवण्याची शक्यता आहे . जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. 

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी परळी शहरात निर्घृण हत्या झाली होती. 18 महिन्यानंतर देखील हत्या प्रकरणातील आरोपी सापडलेले नाहीत.

यासंदर्भात वेळोवेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाने पोलिसांना भेटून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मात्र तपासामध्ये काहीच निष्पन्न होत नसल्याने आज कुटुंब आक्रमक झालं होतं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले होते.

दरम्यान पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माझ्या सिंदूरला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केली आहे. आतापर्यंत महादेव मुंडे हत्या प्रकरणात सात तपास अधिकारी बदलले. CID मार्फत चौकशी करू असं पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान आज  सकाळी मुंडे कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला आणि यानंतर परत त्यांच्या गाडीत बसल्यानंतर पॉयजन घेतल्याची माहिती. त्यांना बेशुद्ध अवस्थेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group