मोठी बातमी : राज ठाकरे – उद्धव ठाकरेंचं ‘मातोश्री’वर पुन्हा मनोमिलन ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी : राज ठाकरे – उद्धव ठाकरेंचं ‘मातोश्री’वर पुन्हा मनोमिलन ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी गुलाबांचा मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलंय. दरम्यान आता कौटुंबिक मनोमिलनानंतर राजकीय मनोमिलन होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईसुद्धा होते.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसाठी लाल गुलाबांचा मोठा पुष्पगुच्छ आणला होता. हा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकत्र आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचं कौटुंबिक मनोमिलन झाल्याचं पहायला मिळत आहे.

 

 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group