नुसतेच येऊन गेले... फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची खोचक टीका
नुसतेच येऊन गेले... फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची खोचक टीका
img
वैष्णवी सांगळे
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा करत सरकारवर दगाबाज असल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली होती, यांना वोटबंदी करा असेही आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यात जाऊन उद्धव ठाकरेंच्या या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. 



परभणीत आयोजित मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नुसता फुकटचा ताठा अन् नाव उबाठा असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. माझ्या हातात काही नाही असं म्हणाले, पण जेंव्हा होते तेंव्हा तरी त्यांनी काही दिले का? असा प्रश्नही एकनाथ शिंदेंनी विचारला. 

अरे आम्हाला दगाबाज म्हणता खरी दगाबाजी कुणी केली? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कुणी बांधली? हे जनतेने ओळखले आहे. म्हणूनच, जनता आमच्या पाठीशी असल्याचेही यावेळी एकनाथ शिंदेंनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group