गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, विरोधकांवर मोठी टीका
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, विरोधकांवर मोठी टीका
img
दैनिक भ्रमर

गिरणी कामगारांनी मोर्चा पुकारला आहे. 'मुंबईत हक्काचं घर मिळावं' तसंच इतरही काही मागण्यांसाठी हा मोर्चा काढला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गिरणी कामगारांनी आपल्या रक्त सांडलं होतं याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी सांगितले की, तत्कालीन सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणण्याचे काम गिरणी कामगारांनी केले होते. आज दिल्लीतील काही नेते मुंबईला “सोन्याची अंडी देणारी कोंबडी” समजतात आणि तीच कोंबडी कापण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला.

गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आणि घराच्या हक्कासाठी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. उद्धव ठाकरे केंद्र सरकार आणि अदानी समूहावर टीका करताना म्हटले की, मुंबईतील धारावीची जागा अदानींच्या घशात घातली जात आहे आणि शहरातील इतर मालमत्ताही त्यांना दिल्या जात आहेत. ज्यांनी मुंबई उभी केली, त्या गिरणी कामगारांना तुम्ही मुंबईबाहेर जागा देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सर्व गिरणी कामगारांना धारावीतच जागा देण्याची मागणी त्यांनी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group