ठाकरे गटाला मोठं खिंडार ; आज तीन महत्वाच्या शिलेदारांचा भाजपात पक्षप्रवेश
ठाकरे गटाला मोठं खिंडार ; आज तीन महत्वाच्या शिलेदारांचा भाजपात पक्षप्रवेश
img
Dipali Ghadwaje
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ४ महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून सध्या फोडाफोडीचं राजकारण उफाळून आलंय.

अशातच मालवणमधून ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे तीन महत्वाचे शिलेदार मशालची साथ सोडत भाजपात जाणार आहेत. आज त्यांचा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मालवणचे तीन नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी आणि दर्शना कासवकर हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी १० वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group