राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. राज्यातील बहुसंख्य महापालिकांत भाजपाचीच हवा आहे. आता नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. नांदेड महापालिकेत भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खातंही उघडता आलेलं नाही.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नांदेड महापालिकेत एकूण ८१ जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील एकूण ४० जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. अजूनही भाजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष सहा जागांवर आघाडीवर असून एका जागेवर विजय झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण सात जागा मिळाल्या आहेत.
तर काँग्रेस आणि आघाडी पक्षाचे उमेदवार ४ जण आघाडीवर असून ६ जणांचा विजय झाला आहे. येथे एमआयएम पक्षाचेही एकूण चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांना मात्र अजून खातंही उघडता आलेलं नाही. ८१ पैकी ४० जागांवर भाजपाचे पदाधिकारी विजयी झाले आहेत. त्यामुळे इथे भाजपाचाच महापौर होणार हे आता स्पष्ट झाले आहे.