रामिनवार दाम्पत्यांकडून ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
रामिनवार दाम्पत्यांकडून ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
img
DB

नांदेड येथील उद्योजक भारत रामिनवार आणि त्यांच्या पत्नी मिरा रामिनवार यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात एक किलो सोन्याचा भव्य मुकुट अर्पण केला.

एक कोटी रुपये किंमत असलेला हा भव्य मुकुट एका महिन्याच्या उत्कृष्ट कारागिरीनंतर तयार झाला. हा मुकुट पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाने सजवलेला आहे.

आषाढी एकादशीच्या पवित्र प्रसंगी हा मुकुट माऊलींच्या चरणी समर्पित करण्यात आला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

रामिनवार दांपत्याने ही भक्तीची अनमोल भेट संत ज्ञानेश्वरांच्या कार्याला वंदन म्हणून अर्पण केल्याचे सांगितले. यामुळे नांदेडसह महाराष्ट्रभरात त्यांच्या भक्तीची चर्चा आहे.

मंदिर प्रशासनाने या दानाचे स्वागत करत भक्तांच्या श्रद्धेचा हा आदर्श असल्याचे म्हटले. गेल्या १२ वर्षांपासून भारत रामीनवार वारीत सहभागी होतात. दरवर्षी त्यांचं कुटुंब अन्नदानाचे आयोजन करतं. या दातृत्वामुळे नांदेडसह राज्यभरात त्यांच्या भक्तीची चर्चा आहे. मंदिर प्रशासनाने या भेटीचे कौतुक करत रामीनवार दांपत्याच्या श्रद्धेचे कौतुक केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group